सोमवार, 8 जून 2020

श्री भक्तविजय ग्रंथ समाप्ति भूमिका

संत महिपती यांनी ग्रंथ संपदा प्रत्येक घरी असावी असे आवाहन केले आहे. ज्या घरी ग्रंथ संपदा आहे त्या घरी,मंदिरी कोणते ही संकट येत नाही जसे विष्णू चे सुदर्शन चक्र संकटाचे निवारण करण्या करता घरटी घालीत आहे. ही एक विलक्षण उदाहरण बुवांनी दिले आहे.
 कली युगात जे संत चरित्राचे वाचन करतील त्यांच्या वर वैकुंठाची कृपा होईल. श्री भक्त विजय ग्रंथांची सांगता करताना महिपती बुवा सांगतात की विठ्ठल कृपे वरून मी या भूमीत बीज रोपले आहे, आता रोपटे येणे हे तुमच्या जीवन कर्मावर अवलंबून आहे.
~विजय प्रभाकर नगरकर (ताहाराबादकर)

श्री भक्त विजय ग्रंथातील मूळ सांगता जरूर वाचावी अशी आहे, ती खालील प्रमाणे-

॥२ ॥ ग्रंथसंग्रह करितां घरीं ॥ तरी विघ्ने न येती त्याचे मंदिरीं ॥ भोंवतें सुदर्शन घिरटी करी ॥ निश्चय अंतरी असों या ॥३ ॥ या ग्रंथामाजी हेचि कथन ॥ की भक्तांसी पावला जगजीवन ॥ म्हणोनि श्रोतयांवक्तयांकारण ॥ रुक्मिणीरमण | रक्षिता ॥४ ॥ कलियुगींची चरित्रे ऐकोनी ॥ सामान्य न म्हणावी विचक्षणीं ॥ कृतत्रेताद्वापारालागुनी । थोरथोर मुनी गातील ॥५ ॥ कलीचा प्रारंभ होतांचि त्वरित ॥ सुरवर आनंदले बहुत ॥ की औटघटिका करितां एकाग्र चित्त ॥ वैकुंठनाथ भेटेल की ॥६ ॥ तंव नारदमुनीने कौतुक केलें ॥ जिव्हा शिश्न हातीं धरिलें ॥ सकळ देवांसी आश्चर्य वाटलें ॥ मग पुसते जाहले तयासी ॥ ७ ॥ यावरी बोले ब्रह्मसुत ॥ हे दोन्ही नावरती कलियुगांत ॥ सुरवरी ऐकतां हे मात ॥ चिंताक्रांत झाले मानसीं ॥ ८ ॥ मग नारद सांगें तयांप्रती ॥ कलियुगी वैष्णव भक्त जे होती ॥ त्यांची चरित्रे जे ऐकती ॥ त्यांमी वैकुंठपती भेटेल ॥ ९ ॥ ऐसें बोलतां ब्रह्मनंदन ॥ विवुध आनंदले संपूर्ण ॥ म्हणती हे स्वल्प साधन ॥ आम्हांकारण मानलें ॥ २१०॥ म्हणोनि महर्षि आणि इंद्रादिकांसी ॥ भक्तचरित्र पावन तयांसी ॥ विचक्षणी वचनें ऐकूनि ऐसीं ॥ विकल्प मानसीं न धरावा ॥ ११ ॥ जैसी आज्ञा केली रुक्मिणीवरें ॥ तितुकींचि ग्रंथीं लिहिली अक्षरें ॥ जैसा वाजविणार फुकितो वारें ॥ तैसींचि वाजंत्रे वाजती ॥ १२ ॥ क्षेत्रांत बीज पेरिले जाण ॥ अंकुर येणे जीवनाधीन ॥ की जळमंडपियाचें नाचणे जाण ॥ कळसूत्राधीन असे कीं ॥ १३ ॥ तेवीं भक्तविजयग्रंथीं । बुद्धीचा दाता श्रीरुक्मिणी पती ॥ तेणें उजळोनियां माझी मती ।। ग्रंथ निजयुक्ती लिहविला ॥ १४ ॥ शके सोळाशें चवन्यायशीं ॥ चित्रभानुनाम संवत्सरासी ॥ वैशाखवद्यद्वादशीसी ॥ ग्रंथ सिद्धीमी पाव विला ॥१५ ॥ प्रवरेपासूनि दक्षिणेस ॥ ताहाराबाद गांव पांच कोस ॥ भक्तविजय अति सुरस ॥ झाला असे ते ठायीं ॥ १६ ॥ शेवटील विनवणी आतां ॥ माझी ऐकें गा पंढरीनाथा ॥ तूंचि श्रोता आणि वक्ता ॥ ग्रंथरक्षिता निज कृपें ॥ १७ ॥ तूं अखिल अविनाश जगद्गुरु ॥ मायातीत सर्वेश्वर ॥ निराधारियांसी आधारु करिसी भवपारु दासांसी ॥ १८ ॥ भक्तांनी जैसी घेतली आळ । ती तूं पुरविसी तत्काळ ॥ त्यांचे प्रेम देखोनि निर्मळ ॥ हृदयकमळी वसविले ॥ १ ९ ॥ कोणासी दिधलें आत्मज्ञान ॥ कोणी मागितले मायुज्यमदन ॥ माझें हेंचि इच्छीतसे मन ॥ जे गुण वर्णीन हरीचे ॥ २२०॥ कोणी बैसले वज्रासनीं ॥ कोणी बसले वैकुंठभुवनीं ॥ मी निजदामांचे कीर्तनीं ॥ झालों रत सप्रेम ॥ २१ ॥ अवीट आवडी धरूनि चित्तीं ॥ तुझिया दासांची वर्णिली स्तुती ।। हैचि उचित महीपती ।। मागे निजप्रीती निरंतर ॥ २२ ॥ स्वस्ति श्रीभक्तविजय ग्रंथ ॥ ऐकतां तुष्टेल जगन्नाथ ॥ प्रेमळ ऐका भाविक भक्त ॥ मतपंचाशत्तमाध्याय रसाळ हा ॥२२३ ॥ श्रीरुक्मिणीपांडुरंगार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ इति भक्तविजयग्रंथः समाप्तः ॥ ।। भक्तविजय सप्तपंचाशत्तमाध्याय समाप्त ।।

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें