सोमवार, 8 जून 2020

संत तुकाराम दृष्टांत

संत तुकाराम दृष्टांत

संत महीपति यांना स्वप्न पडले . स्वप्नात तुकारामबुवा आले . ते म्हणाले , “ नामदेवाची शत कोटी अभंग लिहिण्याची प्रतिज्ञा अपुरी राहिली ती मी पूर्ण केली . संतांची चरित्रे लिहून पूर्ण करण्याचे काम तू करावेस . " महिपतीबुवा जागे झाले . तुकाराममहाराजांनी स्वप्नात येऊन शिष्य म्हणून आपला स्वीकार केला अशी बुवांची खात्री झाली .

 बुवा लिहितात : जो भक्तिनाथ बैराग्यपुतळा । ज्याचे अंगी अनंत कळा ।। तो सदगुरु तुकाराम आम्हांसी जोडला | स्वप्नी दिधला उपदेश ।। ( भक्तिलीलामृत अध्याय १-२० )

 स्वप्नात झालेली तुकारामांची आज्ञा हा ईश्वरी . दृष्टांत आहे , असे समजून महिपतीबुवांनी संतांची चरित्रे लिहिण्यास आरंभ केला . नाभाजींची हिंदी भक्तमाला , उद्धव चिद्धनांची संतमाला , भक्तकथामृतसार व दासो दिगंबर याच्या संतविजय या ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला . नामदेवांचे तीर्थावळी हे प्रकरण वाचले . मग या ग्रंथकाराचा संमत एक करून भक्तविजय आरंभिला । त्यांनी एकनाथ , तुकाराम यांच्या वंशजाकडून माहिती मिळविली आणि मगच लेखन केले . महिपतीबुबांचे ग्रंथ - लेखन त्यांनी नामदेव , ज्ञानदेव , दामाजी , भानुदास , एकनाथ , तुकाराम , बोधलेबुवा गणेशनाथ इत्यादी संतांची चरित्रे आपल्या ग्रंथात लिहिली . या चरित्र - लेखनामागची महिपतीबुवांची वृत्ती भाविकाची आहे . या वृत्तीमुळे पांडुरंगच आपणाकडून चरित्र - लेखन करून घेत आहे , असे त्यांना वाटे . ते म्हणतात :

 ग्रंथ बदविता रुक्मिणीपती । मी तो मंदमती अज्ञान ।। ( ७५ : १ ) वदविता रुक्मिणीकांत । महिपती ज्याचा मुद्रांकित । पवाडे वर्णित संतांचे ( २० ९ : ३४ ) ( संतलीलामृत )

*(श्री भक्तविजय ग्रंथ प्रस्तावना)*

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें