मंगलवार, 21 अप्रैल 2020

संत महीपति ऑक्सफ़ोर्ड प्रेस प्रकाशन

महीपतीबुवांच साहित्य वाचायचं म्हणून इंटरनेटवर शोध घेतला आणि आक्सफर्डच्या मुद्रणालयात मुद्रीत १९१९ मधील पुस्तकाची प्रत मिळाली. सी ए किनकैड यांनी महिपती बुवांच्या ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद केला आहे. प्रस्तावनेतील त्यांचा महिपती बुवांच्या बद्दलचा आदर जाणवतो व त्याच्या त्याग व योगदानाबद्दल गौरवोद्गार लेखकाने वाचकांपर्यंत पोचवले आहेत. दुर्दैवाने महाराष्ट्रातील शालेय ‌अभ्यासक्रमात या ताहाराबाद मधील संतसाहित्यिक संताचा कोठेही उल्लेख दिसत नाही. संतांचं चरित्र जीवन उजळून काढते पण त्याचा किमान महाराष्ट्रातील शिक्षणात समावेश करायला हवा होता. परदेशातील नागरिक भारतीय संत साहित्य ‌अभ्यासत आहेत ज्ञान प्राप्त करत आहेत व आम्ही मात्र त्यांचे ग्रंथ अध्ययन करण्याऐवजी यात्रा उत्सव याच्या ‌अवडंबरातच बुडालो आहोत. मंदिरात कोणालाही वाचायला ग्रंथ उपलब्ध हवेत विक्रीसाठी उपलब्ध हवेत ही योजना करायला हवी...! 
पुर्वी जस्टीन ‌अबाॅट या लेखकाचा परिचय झाला होता आता किनकैड यांचा ग्रंथ मिळाला...
धन्योहम् ताहाराबाद हे आमचं गाव...!

~दत्तात्रय नाईकवाडे, ताहराबादकर

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें