'श्रीभक्तविजय' महिपतीबुवांच्या ग्रंथांपैकी श्रीभक्तविजय हा ग्रंथ श्रेष्ठ होय . तो त्यांनी स्वतःच्या ४७ व्या वर्षी लिहिला . या ग्रंथात सुमारे पन्नास भक्तांच्या चरित्रकथा सांगितल्या आहेत . '
आधार टाकोनि आपुले मनीं ।बोलिलो नाही सर्वथा ।।'
आधाराशिवाय काही लिहावयाचे नाही अशी त्यांची प्रतिज्ञाच होती . नाभाजीने ग्वालेरी भाषेत लिहिलेल्या संतचरित्रावरून , उद्धवचिद्धन यांनी लिहिलेल्या हकीगतीची भर घालून त्यांनी श्रीभक्तविजय हा ग्रंथ लिहिला . ते मुद्दाम खुलासा करतात :
'म्हणाल , निजबुद्धीने त्वरित । आपुले मतीने लिहिला ग्रंथ । । तरी तैसे नव्हे हे निश्चित । विकल्प चित्ती न धरावा ।।जो उत्तरदेशी साचार । नाभाजी विरिंची अवतार ।। तेणे संतचरित्र ग्रंथ थोर । ग्वालेरी भाषेत लिहिला असे ।।
आणि माणदेशी उद्धव चिद्घन त्यांहीं भक्तचरित्रे वर्णिली जाण ।।दोही संमत एक करून । भक्तविजय आरंभिला ।।'
शिवाय आपल्या ग्रंथलेखनाचे श्रेय श्रीविठ्ठलाकडेच देऊन ते म्हणतात :
' जैशी आज्ञा केली रुक्मिणीवरे । तितुकीच ग्रंथी लिहिली अक्षरें ।। जैसा वाजविणार फुकितो वारे । तैसी वाजंत्रे वाजती ।।'
महिपतींनी सगळा भक्तविजय ग्रंथ नाभाजीच्या ग्रंथाद्वारे लिहिला असे नाही . पंधराव्या अध्यायात नामदेव आणि त्यांच्या तीर्थयात्रेच्या प्रसंगाचे वर्णन करताना नामदेवांचे मावंदे स्वतः पांडुरंगाने घातले , असे सांगून महिपतीबुवा त्या ठिकाणी तीर्थावळीच्या अभंगांचा उल्लेख करतात . श्रीभक्तविजयात तुकारामचरित्र सर्व चरित्रात सुरस उतरले आहे .
(श्री भक्तविजय )
~शं रा देवळे
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें