नेवासे गावचे मध्यवस्तीत मोहिनीराजाचे भव्य मंदिर आहे. मंदिराचे सर्व बांधकाम हेमाडपंथी आहे. प्रत्येक दगड नक्षीने कोरलेला आहे. विविध प्रकारच्या मूर्ती दगडावर आहेत. मंदिर पूरातन असून त्याचे बांधकाम अहिल्याबाईचे दिवाण श्री चंद्रचूड जहागीरदार यांनी करवून घेतले आहे. मंदिराचे बांधकाम उंचावर असून प्रवेशद्वार उत्तर कडे आहे. प्रवेश द्वारावर भालदार, चोपदाराच्या मूर्ती असून सभामंडपात प्रवेश केल्यावर पूर्वेकडे तोंड केले असता, भव्य गाभा-यात उंच सिंहासनावर शंख, चक्र, गदा, अमृताची कूपी, नाकात नथ, कमरेला कमरपट्टा, डोक्यावर मुकूट, पायात तोडे व पितांबर परीधान केलेली 4 ।। फूट उंचीची भव्य श्री मोहिनीराजाची मूर्ती दृष्टीस पडते व मन प्रसन्न होते. शेजारी श्री लक्ष्मीची मूर्ती आहे.
समुद्रमंथन झाले असता 14 रत्ने बाहेर आली. त्यापौकी अमृत हे एक होय. अमृताचे वाटपाचे काम देवांनी श्री विष्णू कडे सोपवले. श्री विष्णूनी मोहिनीचे (अर्धनारी नटेश्वर) रुप घेवून देव आणि दानव यांच्यात अमृत व मंदिराचे वाटप युक्तीने केले. देव आणि दानव यांना एकाच पंक्तीत समोरासमोर बसून देवांना अमृताचे वाटप तर दानवांनी सुरा म्हणजेच मदिरेचे वाटप केले. हे फक्त राहू व केतू या दानवांना लक्षात आले व ते देवांच्या पंक्तीत येवून बसले. मोहिनीरुप घेतलेल्या विष्णूने त्यांना अमृत दिले परंतू त्यांनी अमृत पिताक्षणी ते विष्णूचे लक्षात आले व सूदर्शन चक्राने लगेच त्यांचे शीर छेदले गेले. परंतू त्यांचे शीर अमर झाले.
श्री विष्णूने मोहिनीरुप घेवून अमृताचे वाटप केले ते नेवासे येथे म्हणून मोहिनीराजाचे भव्य मंदिर नेवासे येथे आहे. श्रीचा उत्सव माघ शुद सप्तमी म्हणजे रथ सप्तमीपासून सुरु होतो. पोर्णिमेच्या दिवशी कुलार्म कुलाचार करतात. मंदिरात भागवत सप्ताह ही सुरु होतो व उत्सव पुढे पाच दिवस चालतो. या उत्सवात किर्तन, गायन व भोजन असे कार्यक्रम होतात. उत्सवाची संधगता काल्याने होते.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें