शनिवार, 30 अप्रैल 2011

संत चरित्रकार- संत महिपती महाराज चित्रपट


संत महिपती यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाविषयी-
कैन्डस पिक्चर प्रा. ली.
आनंदसागर डिजिटल क्रिएशन प्रस्तुत, मराठी चित्रपट, ''संत चरित्रकार महिपती''
निर्मिता-                                 श्री. ज्ञानेश्वर चांगदेव माने.
सहनिर्माती-                             सौ. शामबाला ज्ञानेश्वर माने
निर्मिती सहाय्य-                      श्री. संत कवी महिपती महाराज देवस्थान ट्रस्ट, ताहाराबाद.
दिग्दर्शक-                               बंटी तारडे
लेखक-कथा-पटकथा-संवाद-      मोहम्मद अनिस
छायाचित्रण-                            सुनील भोंगळ, बंटी तारडे
स्थिरचित्रण -                           ज्ञानेश्वर माने, निलेश कुंभार
प्रकाश योजना-                          विक्रम धुमाळ, जयेश सुडके, शंकर भोसले, सोमनाथ शेळके, बंटी भगत.
कला-                                       संदीप भिंगारदिवे, अशोक भोंगळ, सचिन भिंगारदिवे,  विनायक कांबळे,  
                                               सुनील भोंगळ
वेशभूषा-                                   गणेश तरडे
रंगभूषा-                                    ज्योती गोसावी

प्रमुख कलाकार-
संत महिपती-                 श्री. शिरीष गुणे
सरस्वती-                       डॉ. मंजिरी भुजबळ
दादोपंत-                        मुकुंद देनडगे
गंगुबाई-                         वृंदा बाळ
गुलाब पाटील-                 प्रकाश धोत्रे
धोंडिभाऊ-                      राजेश मंचरे
केशवबुवा-                      अजय लांगोरे
संत ज्ञानेश्वर-                  निकिता कुलकर्णी
दिवाकर-                        योगेश निकम
सुमित्रा-                          आम्रपाली शेळके
ताहीरखान-                     सुनील जैन
काशिद-                          विनोद कदम
तुकाराम महाराज-            रोहिदास खेडकर
पांडुरंग-                           विलास कुलकर्णी
काळ्या न्हावी-                 adv पोपट चव्हाण
खंड्या-                            डॉ. बापू हरिश्चंद्रे
परश्या-                           नरेश जाधव
ब्राम्हण पत्नी-                   रेखा थोरात
जवळेकर-                       मोहम्मद अनिस
वत्सला-                         बागेश्री सप्तर्षी
चोर-                              नाना तरंगे, अनिस शेख

निर्मात्याचे मनोगत-
श्री. ज्ञानेश्वर माने, रा. राहुरी, जि. अहमदनगर
जन्म दिनांक- २६/०६/१९७०.
शिक्षण- प्रार्थमिक व माध्यमिक शिक्षण राहुरी येथे  तर महाविद्यालयीन शिक्षण मुंबई येथे.
कलेविषयी ओढ होतीच., चित्रपट एकांकिका या विषयी आदर होता. सन १९८८ पासून फोटोग्राफी सुरु केली, त्याच वेळी राहुरी येथील ब्रम्हचारी संत बैरागीबाबा यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच काळात हॉरर लघुपट निर्मिती सुरु केली. परंतु निर्मिती क्षेत्रातील परिपूर्ण ज्ञान नसल्याने निर्मिती मध्येच थांबवावी लागली. नंतर पंढरपूर येथील बालयोगी महाराज यांचा सहवास लाभला. आणि अध्यात्मिक क्षेत्रातील वाटचाल सुरु झाली. संतचरित्रे व अध्यात्म ग्रंथ यांचे वाचन वाढले. सन २००८ मध्ये संतकवी महिपती महाराज यांचे चरित्र वाचनात आले. झपाटून जाऊन त्यांनी केलेल्या इतर चरित्र ग्रंथांचेही वाचन झाले. त्याचवेळी त्यांच्या आयुष्यावर चित्रपट निर्मिती करण्याची मनीषा उत्पन्न झाली. अनेक जणांच्या भेटीगाठी घेतल्या. परंतु पदरी निराशा येत होती., परंतु दिग्दर्शक बंटी तारडे यांच्या भेटीने मार्ग सुकर झाला.

आम्ही अनेकांच्या मुलाखती घेतल्या, महाराजांच्या वंशजांचे अनमोल सहकार्य लाभले. तयार झालेली कथा- पटकथा संस्थांचे अध्यक्ष श्री. रावसाहेब साबळे यांच्यासमोर मांडली. त्यांना ती आवडली. आर्थिक मदतीसाठी श्री. रामदास धुमाळ यांनी श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिक्षकांच्या माध्यमातून प्रयंत्न केले. निर्मितीचे काम तर सुरु झाले परंतु अनुभवी व योग्य कलाकार निवडणे हि खूप मोठी जबाबदारी होती.

परंतु परमेश्वरी आशीर्वादाने विधायक कार्यामध्ये अडचण निर्माण झाली नाही. प्रमुख कलाकार म्हणून श्री. शिरीष गुणे सर यांची निवड झाली. त्यांनी इतकी उत्कृष्ट भूमिका केली कि प्रत्यक्ष चित्रिकरणा वेळी त्यांच्या अनुभवाचा विशेष उपयोग झाला.

चित्रपटाच्या माध्यमातून २५० वर्षापूर्वीचा काल उभा करणे हि खरे तर खूप मोठी कसोटी होती. परंतु सर्वांच्या सहकार्याने ती सहज पार पडली. त्यावेळची भाषाशैली, वेशभूषा, केशभूषा, भांडी यांचा अभ्यास करून बुद्धीचा कस लावुन चित्रपटासाठी त्या गोष्टींचा वापर सुरु केला गेला.

चित्रपटाचे स्पेशल इफेक्ट्स व तांत्रिक सहाय्य कैडस पिक्चर प्रा. ली., पुणे चे श्री. कुणाल कुलकर्णी यांचे विशेष सहकार्य लाभले. श्री क्षेत्र ताहाराबाद देवस्थान ट्रस्ट ने नेहमीच भरीव अनमोल सहकार्य केले आहे.

गीतकार श्री. इनामदार, गायक श्री. संतोष कुळात यांच्या प्रतिभेची अत्युकृष्ट कलाकारी चे चित्रपटाचे वैशिट्य म्हणावे लागेल. वारकरी संप्रदायाची निगडीत संगीत श्री. केदार जोशी यांनी दिले आहे. नगर जिल्ह्यातील सर्वात प्रथम ७० एम एम (सिनेमास्कोप) चित्रपट प्रेक्षकांसमोर आणताना मला मनस्वी आनंद होत आहे.

लेखकाचे मनोगत-

नाव- मोहम्मद अनिस., मु. पो. गुहा, ता. राहुरी

संत कवी महिपती महाराजांच्या जीवन चरित्रपट उलगडून दाखविणाऱ्या चित्रपटाची कथा लिहिण्याची जबाबदारी माझ्याकडे आली हे मी माझे भाग्य समजतो. आजपर्यंत अनेक विनोदी, सामाजिक, धार्मिक नाटके लिहिली, दूरचित्रवाहिणीची  मालिका लिहिली. परतू या चित्रपटाची कथा लिहिताना घेतलेल्या मुलाखती आणि प्रत्यक्ष महाराजांचे साक्षात्काराचे आलेले अनुभव यामुळे ही सूचना ईश्वरीय सूचना असल्याची जाणीव झाली. मी स्वतः अध्यात्मिक बनत गेलो. निर्माता, दिग्दर्शकांचे अनमोल सहकार्य मिळाली.  माझ्या दृष्टीने हा चित्रपट सामाजिक, धार्मिक, कलात्मक, कलाकृती आहे. हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित व्हावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

दिग्दर्शकाचे मनोगत-

श्री. दत्तात्रय दामोधर तारडे, मु. पो. केंदळ, ता. राहुरी 

दिग्दर्शक म्हणून माझा पहिलाच चित्रपट, परंतु संतकवींच्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणे हीच माझ्यासाठी मोठी सुरुवात आहे. २५० वर्षांपूर्वीच्या भाषा, वेश यांच्याशी साम्य साधणारे दिग्दर्शन करणे हि खरेच अवघड गोष्ट होती. परंतु सर्वांच्या सहकार्याने मी ते सुरु करू शकलो. हा चित्रपट मराठी चित्रपट क्षेत्रातील एक मोठी क्रांती घडविणारा ठरेल असा मला विश्वास वाटतो. संतांचे आचारविचार समाजात पोहोचविण्यास मदत होईल.  या चित्रपटाला भेटलेल्या सर्व स्तरातील सहकार्यांचे मी आभार मानतो.

छायाचित्रकाराचे मनोगत-

श्री. सुनील सखाराम भोंगळ, मु. पो. जोगेश्वरी आखाडा, त. राहुरी 

या चित्रपटाची जबाबदारी निर्माता, दिग्दर्शक यांनी माझ्यावर सोपविली आणि मी भरून गेलो. २५० वर्षांपूर्वीची पौराणिक कथा व सद्यस्थिती यांचा मेळ साधने कसरतीचे काम होते, परंतु हा चित्रपट अतिशय उत्कृष्टपणे चित्रित झाला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना भावणारा असेल. या चित्रपटातून संत कवी महिपती महाराजांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात होईल, असा मला विश्वास वाटतो.

सौजन्य-       श्री. निलेश मनोहर पांडे 
  ७५५, मेन रोड, शिवाजी चौक, 

विद्या मंदिर प्रशाले जवळ, राहुरी,
जि. अहमदनगर, महाराष्ट्र. 
http://sites.google.com/site/meerahurikar/sant_mahipatiसंपर्क- (२४२६) २-३-४-५-६-८
भ्रमणध्वनी- ९८५०१९२७८० / ९८९०३६६००२  

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें