शनिवार, 24 जुलाई 2010

संत महिपती विशेषांक - पंढरी संदेश

श्रीक्षेत्र पंढरपुर येथुन साप्ताहिक पंढरी संदेशने श्रेष्ठ संत कवी महिपती महाराज जीवन कार्य दर्शन दिपावली विशेषांक 1992 रोजी प्रकाशित केला आहे. श्री गजानन पंढरीनाथ बिडकर यांनी हा विशेषांक श्री गजानन प्रेस,2538,दर्शन मंडप,पंढरपुर येथुन प्रकाशित केला आहे. या अंकात श्रेष्ठ संत कवी महिपती महाराज यांच्या जीवन कार्यावर  विविध 34 लेखकांचे लेख प्रकाशित झाले आहेत. श्री.दा.का.थावरे यांनी संपादकिय लिहिले आहे. ते आपल्या संपादकियात म्हणतात की श्रेष्ठ संत कवी महिपती यांनी महाराष्ट्रावर संतचरित्र लेखनाने महत् उपकार करुन ठेवले आहेत.त्यांचे ऋण सतत शिरी वहावे असे आहे. या असंख्यात ओवी लेखनात सदाचार,नीती,धर्म,भक्ति याचा विचार आहे. भक्तिविजय सारख्या त्यांच्या ग्रंथाचे सामुदायिक वाचन खेडोपाडी प्रतिवर्षी होत आहे यात मागील 150 वर्षापासुन खंड नाही. हे ऋण एकदा गौरवावे म्हणुन पंढरी संदेशने त्यांच्या निर्णयशताब्दि निमित्त त्यांचा स्मरण अंक काढला आहे.
या विशेषांकात ह.भ.प. चंद्रशेखर महाराज देगलुरकर,नानामहाराज कांबळे, कुमार कोठावळे, भा.प.बहिरट,भीमाशंकर देशपांडे,द.शि.तरलगट्टी, पांडुरंग महाराज ताहराबादकर,ड़ॉ.प्र.न.जोशी, डॉ.म.प.पेठे, पां.ग.हरिदास, स.कृ.देवधर,सौ.सु.द.कुलकर्णी, अनिल देशपांडे, प्र.द.निकते, डॉ.वा.पु.गिंडे,प्र.दि.कुलकर्णी, ग.प.बिडकर यांचे लेख सामाविष्ट केले आहेत.

संत महिपती यांच्या ग्रंथांवर संशोधन करण्यासाठी या लेखांचे मार्गदर्शन होउ शकते.

2 टिप्‍पणियां:

  1. Namaste

    I am developing a Web site on SantMahipati.info I need your pl send me your contact No . or mail me your contact no

    Details
    datta.naikwade@gmail.com
    9028746492

    जवाब देंहटाएं
  2. आपल्या कामाकरीता हार्दिक शुभेच्छा. मी मदत करण्यास तयार आहे माझा मो. 9422726400

    जवाब देंहटाएं