गुरुवार, 13 अगस्त 2020

संत महीपति परिचय - स्व जगन्नाथ आजगांवकर

स्व श्री जगन्नाथ रघुनाथ आजगांवकर, मुम्बई यांनी 1944 साली मुम्बई विद्यापीठ  मराठी पाठ्य पुस्तक " महीपति कृत एकनाथ व तुकाराम चरित्र " मधील संत महीपति महाराज यांचा परिचय।

महीपति 

महिपतिच्या वाणीते सेवुनि तरतात जैवि गंगेतें । 
विषयांत रंगलें जें जनमानस सद्यशींच रंगे तें ॥ - मोरोपंत 
“ महीपतीनी लिहिलेल्या कवितेचे सेवन करून , गंगेचे सेवन केल्या प्रमाणे लोक तरतात , आणि विपयोपभोगांत रंगून गेलेले मन साधुसंतांच्या यशोगानांत रंगून जाते , " असा , महीपतींच्या काव्यसरितेविषयी रसिक शिरोमाणि कविवर्य मोरोपंत यांनी वरील सुंदर आर्यंत जो अभिप्राय व्यक्त केला आहे तो अगदी योग्य आणि ययार्थ आहे असे कोण म्हणणार नाही ? संत चरित्रकार या नात्याने तर महाराष्ट्र कविमंण्डलांत महीपतींचे स्थान अगदी स्वतंत्र आहे . जुन्या साधूंची चरित्रे अर्वाचीन पद्धतीने लिहूं इच्छिणारास देखील महीपतींच्या ग्रंथांचे साहाय्य घेतल्याशिवाय गत्यंतर नाही इतकें सांगितले म्हणजे वाचकांस त्याच्या कामगिरीची कल्पना होईल . आपल्या कालापूर्वी उभ्या हिंदुस्थानांत होऊन गेलेल्या बहुतेक सर्व साधुसंतांची चरित्रं महीपतींनी आपल्या संतचरित्र पर चार मोठ्या ग्रंथात इतक्या रसाळ वाणीने वर्णिली आहेत की , अर्वाचीन पद्धतीची संतचरित्रे यापुढे कितीही बाहेर पडली तरी महीपतींच्या ग्रंथांची लोकप्रियता लवलेशही कमी होण्याचा संभव नाही . बहुजनसमाजास जो प्रेमळपणा पाहिजे , जो रसभरितपणा पाहिजे , जो प्रसाद पाहिजे ते गुण आम्हा अर्वाचीन लेखकांच्या लिखाणांत कसे येणार ? रूक्ष तर्ककर्कशता आणि वाजवीपेक्षा अधिक विचिकित्सा यांच्या भरीस श्रद्धाहीनतेची जोड मिळाल्यावर , प्रेमळपणा आणि रसोत्कर्ष यांची अपेक्षा करणे हे सहाराच्या वाळवंटात नंदनवनाची अपेक्षा करण्याइतकेंच मूर्खपणाचे आहे . जुन्या संतकवीचे ग्रंथ महाराष्ट्रातील बहुजनसमाज अद्याप मोठ्या आवडीने वाचतो आणि आमच्या ग्रंथांकडे पाहून नाक मुरडतो याचे कारण हेच होय . गेल्या सातशे वर्षांत शेंकडों संतकवि महाराष्ट्रांत होऊन गेले व त्यांतले पांचदहा कवि फार लोकप्रिय आहेत , परंतु त्यांतल्यात्यांत श्रीधर आणि महीपति यांचेच ग्रंथ महाराष्ट्रात अद्याप फार वाचले जातात . किंबहुना श्रीधर आणि महीपति यांनी महाराष्ट्रांतील बहुजनसमाजाच्या धार्मिक आणि नैतिक शिक्षणाची कायमची जबाबदारी आपल्यावर घेतली आहे असे म्हण ण्यांत फारशी अतिशयोक्ति होणार नाही . तर अशा या थोर सत्कवीचें संक्षिप्त चरित्र आरंभी देऊन नंतर त्याच्या कवितेच्या गुणदोषांची यथामति चर्चा करूं .

 महीपतींचे वडील दादोपंत कुळकर्णी हे मोगलांच्या पदरी होते . तिकडून आपल्या वयाच्या ४० व्या वर्षी ते हल्लीच्या अहमदनगर जिल्ह्यांतील ताहराबाद नामक गांवीं येऊन राहिले . अहमदनगर , ताहराबाद इत्यादि नांवांवरूनच या प्रांतांत एका कालीं मुसलमानाचे किती वर्चस्व होते याची कल्पना होण्या सारखी आहे . दादोपंत हे ताहराबाद येथे येऊन राहिल्यावर , तेथे ते स्नान संध्या , देवदेवतार्चन इत्यादि धर्मकार्य करून कालक्षेप करीत असत . दर महिन्यास पंढरीची वारी करण्याचा त्यांचा क्रम होता व तो त्यांनी निर्विघ्नपणे दोन तपें चालविला . पोटी पुत्रसंतान नसल्यामुळे आपल्यामागे वारी बंद पडेल असा विचार त्यांच्या मनांत येऊन , एकदां पंढरीस असतांना , श्रीविठ्ठलाच्या चरणावर मस्तक ठेवून ते म्हणाले , “ भगवंता , वारी चालू राहण्याची व्यवस्था होईल तर बरे होईल . ” पुढे रात्रौ ते देवळांतील एका ओरीत निजले असतां , असा चमत्कार झाला म्हणून सांगतात की , श्रीविठ्ठलाने स्वप्नांत त्यांच्या हातांत एक पेढा दिला व हा आपल्या पत्नीस खावयास द्या " असे सांगितले . दादोपंत जागे होऊन पहातात तो हातांत खरोखरच पेढा आहे ! मग ते ताहराबादस गेले आणि तो पेढा त्यांनी आपल्या पत्नीस खावयास दिला . लवकरच ती गर्भवती झाली . ताहराबाद येथे महीपतींचा जन्म सन १७१५ ( शके १६३७ ) त झाला ; दादोपंतांची साठी उलटल्यावर त्यांनी हे पुत्रमुख पाहिले . महीपति हे ऋग्वेदी वाशिष्ठ गोत्री देशस्थ ब्राह्मण ; आडनांव कांबळे . महीपति रूपाने फार सुंदर होते तसे बुद्धीनेही चलाख होते . त्यांचा बांधा सुदृढ होता . बाळपणचे खेळ म्हणजे भजन पूजन . दगडाच्या चिपळ्या घेऊन ते भजन करीत . ते पांच वर्षाचे झाले तेव्हां त्यानी वडिलांपाशी पंढरपुरास जाण्याचा हट्ट घेतला . वडील अशक्त झाले होते म्हणून त्यांनी आपल्या विश्वासाचा एक कासार व दोन ब्राह्मण बरोबर देऊन महीपतींस पंढरपुरास पाठविले . तेथे त्यांनी श्रीपांडुरंगाचे दर्शन घेतले व क्षेत्रप्रदक्षिणा केली . महीपतींचे शिक्षण बरेच झाले होते . त्यांनी स्वहस्ते लिहिलेले ग्रंथ उप लब्ध आहेत त्यांतील त्यांचे हस्ताक्षर चांगले आहे . ' कथासारामृत ' हा आपला ग्रंथ त्यांनी संस्कृत पुराणग्रंथांच्या आधाराने लिहिला आहे यावरून त्यांना संस्कृत भाषा अवगत असावी हे उघड दिसते . मात्र , एकनाथ , मुक्तेश्वर , वामन , मोरोपंत यांच्यासारखे ते मोठे व्युत्पन्न पंडित होते असे मानण्यास आधार नाही . मराठी तर त्यांची मातृभाषाच होती , पण त्याशिवाय , गुजराथी , हिंदी व कानडी याही भाषा त्यांस अवगत होत्या . आपल्यापूर्वी होऊन गेलेल्या ठळक मराठी कवींची कविता त्यांनी लक्षपूर्वक वाचली होती हे त्यांच्या ग्रंथांवरून दिसते . महीपति आपल्या वयाच्या १६ व्या वर्षापासून कुळकरणाचे काम करूं लागले . ताहराबादचे कुळकर्ण व जोशीपणा ही त्यांच्या घराण्याकडे होती . ताहराबाद हा गांव एका मुसलमानाचा जहागिरीचा गांव होता . त्याच्या कचेरीत महीपतींस नित्य जावे लागत असे . एके दिवशी ते कचेरीतून आल्यावर , स्नान करून देवपूजेस बसले असतां जहागिरदाराचा शिपाई त्यांस बोलावण्यास आला . ' देवपूजा आटोपतांच येतो ' असें महीपतींनी त्यास सांगितले . इत क्यांत आणखी दोन बोलावणी आली . तेव्हां तो यवन शिपाई त्यांस कांहीं उणेअधिक शब्द बोलला . ते ऐकून महीपतींस फार वाईट वाटले . पूजा आटोपल्यावर ते जहागिरदाराच्या वाड्यांत गेले व तिकडचे काम संपवून घरी कानास लेखणी होती ती देवापुढे ठेवून त्यांनी शपथ वाहिली की आजपासून गांवकामांत लेखणी हाती धरणार नाही . ” ही शपथ शेवटपर्यंत त्यांनी पाळली व त्यांचे वंशजही ती पाळीत आले आहेत , व सात पिढ्यांपर्यंत ती तशीच पाळली जावयाची आहे . महीपतीस विठ्ठलबोवा व नारायणबोवा असे दोन पुत्र होते . पैकी विठ्ठलबोवा हे गवयी असून दुसऱ्या बाजीरावांचे आश्रित होते ; व त्यामुळे ते पुण्यास रहात असत . महीपतींचे वंशज हल्ली ताहराबाद येथे आहेत , त्याच्यापैकी काही कीर्तन फार चांगले करितात . 

महीपतींचा वंशवृक्ष येणेप्रमाणे : दादोपंत + गंगाबाई आल्यावर , महीपति ( चरित्रनायक ) विठ्ठलबोवा नारायणबोवा 1 गंगारामबोवा उदाराम आत्माराम सीताराम अण्णाबोवा महीपति रंगनाथ  

मोरोपंत , अमृतराय , मध्वमुनीश्वर , रामजोशी , मोरोपंत , सोहिरोबा , शिवदिन केसरी , देवनाथ हे सर्व कवि महीपतींचे समकालीन होत ; मात्र यांपैकी कोणाशी त्यांचा परिचय होता की काय , यासंबंधाची माहिती उपलब्ध नाही . मोरोपंत महीपतींहून १४ वर्षांनी लहान होते . महीपतींच्या पत्नीचे नांव काय होते हे कोठेही नमूद केलेले आढळत नाही . दादोपंतांचा वृद्धापकाल झाल्या मुळे त्यांची पंढरीची वारी महीपतींनी पुढे चालविली . पंढरपूर , पांडुरंग आणि वारकरी साधुसंत यांच्या संबंधाने तुकारामबुवांच्या पश्चात् , महीपतींनी जितकें वाङ्मय लिहिले तितकें दुसऱ्या कोणी लिहिले नाही . महीपतींची पंढरीची वारी कधी चुकली नाही . त्यांच्या वृद्धापकाली ते एकदां पंढरपुरास जात असतां घोड्यावरून पडले तेव्हा त्यांच्या इष्टमित्रांनी त्यांस परत घरी आणले , त्या वेळी त्यांनी पांडुरंगास एक लहानसे ओवीबद्ध पत्र पाठविले ते याच लेखांत पुढे दिले आहे . तुकारामबुवांनी आपणास स्वप्नांत दृष्टांत देऊन संतचरित्रं गाण्याची आज्ञा केली असे मही पति म्हणतात . 

नमूं सद्गुरु तुकाराम । जेणे निरसिला भवभ्रम । आपुले नामी देऊनि प्रेम । भवबंधन निरसिलें ॥३ ॥ -भक्तविजय , अध्याय १ ला “ ज्याने मस्तकी ठेविला अभयकर । दुस्तर भवाब्धि केला पार । तो तुकाराम सद्गुरु वैष्णववीर । ग्रंथारंभी नमस्कार तयासी ॥ मृत्युलोकी दाविली अघटित करणी । देहासमवेत गेले वैकुंठभुवनीं । अद्यापि शुद्ध भाव देखोनी । देती स्वप्नी उपदेश ।। -संतलीलामृत , अ ० १ ला .
या ओव्यांत स्वतः महीपतींनी जी गोष्ट स्पष्टपणे नमूद केली आहे तिच्या सत्यत्वासंबंधाने शंका घेण्याचे काही कारण आहे असे मला वाटत नाही . तुकोबांनी आपल्या निर्याणानंतर बहिणाबाई , निळोबा व कचेश्वर यांनाही असेच दृष्टांत दिल्याच्या कथा ग्रंथांतरीं वर्णिल्या आहेत . तुकाराम बुवांस महीपतीसारखा प्रेमळ शिष्य चांगला शोभतो यांत संशय नाही . मही पतींनी शेकडों संतांची चरित्रे लिहिली आहेत , परंतु त्यांनी लिहिलेल्या तुकाराम चरित्राइतके सुंदर जुने संतचरित्र मराठी भाषेत दुसरे नाही .
 महीपतींचा पहिला संतचरित्रावषयक ग्रंथ भक्तविजय हा शके १६८४ या वर्षी पूर्ण झाला . त्या वेळी त्यांचे वय ३७ वर्षांचे होते . अर्थात् त्यापूर्वी थोडे दिवस महीपतींस तुकोबांचा दृष्टांत झाला असावा . तुकारामबुवा हेच आपचे गुरु होत असें महीपतींनी इतत्रही सांगितले आहे :
 सद्गुरु तुकाराम समर्थ । अंतरसाक्ष चैतन्यनाथ । तेणे होवोनि हृदयस्थ । आठव माते दीधला ॥१० ९ ॥ -संतलीलामृत , अ . ३५ वा . सद्गुरु तुकाराम समर्थ । तयासि माझा प्रणिपात । ज्याने अवतार घेवोनि मृत्युलोकांत । दाविला भक्तिपंथ साधकां ॥१४ ॥ N * जो भक्तिज्ञानवैराग्य पुतळा । ज्याच अंगी अनंत कळा । तो सद्गुरु तुकाराम आम्हांसि जोडला । स्वप्नी दिधला उपदेश ॥२० ॥ मी तरी सर्वाविषयी हीन । ऐसे साक्ष देतसे मन । परी कृपा केली कवण्या गुणें । त्याचे कारण तो जाणे ॥ २१ ॥ -भक्तलीलामृत , अ ० १ ला .
 महात्मा येशू ख्रिस्त यास क्रुसी देण्यात आल्यामुळे तो मृत्यु पावला व त्यानंतर तीन दिवसांनी त्याने आपल्या आईस व शिष्यांस दर्शन दिले अशी कथा खिस्ती पुराणांत वर्णिली आहे . आमच्या काही संतांच्या बाबतीतही असाच प्रकार घडला असावा . असो . महापतींचा पहिला ग्रंथ भक्तविजय होय हे पूर्वी सांगितलेच आहे . मही पतीनी लिहिलेली एकंदर कविता येणेप्रमाणे : 
ग्रंथ पद्यसंख्या रचनाकाल १ भक्तविजय , अ .५७ ओव्या ९९ १६ शके १६८४ ५३५ ९ ३ भक्तलीलामृत ,, ५१ १०७ ९ ४ ४ संतविजय २६ ४६२८ ५ कथासारामृत , अ . ३६ ७२०० १६८७ ६ पंढरीमाहात्म्य , १२ ७ अनंतव्रतकथा २ संतलीलामृत , " " 
१५ : ८ दत्तात्रेयजन्म ९ तुलसीमाहात्म्य अ ० ५ ७६३ १० गणेशपुराणाचा काही भाग , अ . ४ ११ पांडुरंगस्तोत्र १०८ १२ मुक्ताभरणव्रत १३ ऋषिपंचमी व्रत १४२ १४ अपराधनिवेदनस्तोत्र १०१ १५ अभंग व स्फुट पदें या एकंदर ग्रंथाची पद्यसंख्या सुमारे ४०००० होईल .
 भक्तविजयांत ज्या संतकथा वर्णन करावयाच्या राहिल्या त्यांचा संग्रह करावा म्हणून महीपतींनीं ' संतलीलामृत ' हा दुसरा ग्रंथ लिहिला , हे पुढील ओव्यांवरून दिसतें : आतां कलियुगामाजी निश्चिती । बौद्ध अवतार धरी श्रीपति । तरी अज्ञानी जन कैसे तरती । मग अवतार संती घेतले ॥ ६२ ॥ त्यांचे चरित्र यथापद्धती । तें वर्णिले भक्तविजय ग्रंथीं । परी ते कदा संपूर्ण न होती । आस्था चित्तीं दुणावे ॥ ६३ ॥ असंख्य ईश्वराच्या विभूति । संख्या करितां न पुरेचि मती । अंगीचे रोम आहेत किती । ते न गणवती सर्वथा ॥६४ ॥ परी एक सांगतों आपुलें मत । भक्तस्तवनी रमले चित्त । यालागी संतलीलामृत । दुसरा ग्रंथ आरंभिला ॥६५ ॥ भक्तविजयांत राहिली चरित्रे । ती येथे ऐकावी सविस्तर । बुद्धीचा दाता रुक्मिणीवर । सर्व भार तयावरी ॥ ६६ ॥ या ओव्यांत भक्तविजयानंतर संतलीलामृत लिहिले असे स्पष्ट सांगितले आहे , पण १८८६ साली मारुती जनार्दन दांडेकर यांनी प्रसिद्ध केलेल्या व त्यांच्याच प्रतीवरून पुढील तीन प्रकाशकांनी छापलेल्या ' संतलीलामृता'च्या अखेरीस ग्रंथसमाप्तिकाल शके सोळाशे एकूणऐशीं । सर्वजित नाम संवत्सरासी । फाल्गुन शुद्ध चतुर्थीसी । ग्रंथ सिद्धीसी पावला ॥ असा दिला आहे . पण यांतला ‘ एकोणऐशी ' हा पाठ चुकीचा असून , महीपतींच्या स्वदस्तुरच्या हस्तलिखित प्रतीत ' शके सोळाशे नव्यायशीं ' असा पाठ आहे .

 संतलीलामृतानंतर महीपतींनीं ' भक्तलीलामृत ' हा सर्वांत मोठा संत कथाग्रंथ लिहिला . त्याच्या पहिल्या अध्यायांत ते लिहितात 
त्यांची चरित्रे व्हावया प्रख्यात । युक्ति केली पंढरीनाथें । मज पुढे करूनि निमित्त । श्रीभक्तविजय ग्रंथ वदविला ॥ दुसरा संतलीलामृतसार । त्यांतही चरित्रं वर्णिली फार । परी आणिक कथा राहिल्या अपार । मग रुक्मिणीवरें आज्ञापिलें । म्हणोनि भक्तलीलामृत जाण । ग्रंथ आरंभिला दुसऱ्याने । महीपतींचा संतचरित्रविषयक चौथा ग्रंथ '
 संतविजय ' हा अपूर्ण आहे अशी समजूत आहे . याचे २६ अध्याय असून त्यापैकी पहिल्या २५ अध्या यांत श्रीसमर्थ रामदासचरित्र विस्तारेंकरून वर्णिले आहे व २६ व्या अध्यायात बाबाजीबावा अरणगांवकर यांचे चरित्र दिले आहे . या ग्रंथाचा शेवटचा कलशाध्याय म्हणून १८ ९ ओव्यांचा एक अध्याय हल्ली छापला आहे , पण तो इतका अशुद्ध आहे की तो महीपतिकृतच आहे असे मान ण्यास मन प्रवृत्त होत नाही . हा ' संतविजय ' ग्रंथ महीपतिकृत नसून कोणी तरी रामदाससांप्रदायी गृहस्थाने तो महीपतींच्या नांवावर दडपून दिला असावा अशा अर्थाचा एक लेख प . वा . डॉ . प्रभाकर रामकृष्ण भांडारकर यांनी ' एक पुण्यकपट ' या सदराखाली ' विविधज्ञानविस्तार ' मासिकात पूर्वी प्रसिद्ध केला होता , पण खुद्द महीपतींनीच लिहिलेला ' संतविजय ' त्यांच्या वंशजांपाशी असल्यामुळे , तशी शंका घेण्याचे काही कारण नाही . महीपतीनी स्वहस्ते लिहि ' संतविजय ' अपूर्ण आहे असे त्यांच्या वंशजांचे म्हणणे आहे व उपलब्ध असलेल्या संतविजयाचे शेवटी ज्या अर्थी फलश्रुति व ग्रंथसमाप्तिकालनिर्देश नाही त्या अर्थी ते म्हणणे खरे असावे असे वाटते ; व यावरून सदर ग्रंथ पूर्ण होण्यापूर्वी महीपति स्वर्गस्थ झाले असावे असेंही वाटते . पूर्वी भक्तविजयांत रामदासस्वामींचे थोडेसें चरित्र महीपतींनी दिले लेला हा
. होते ; त्यानंतर त्या चरित्राची अधिक माहिती मिळत गेली व इतरांनी लिहि लेले समर्थचरित्रग्रंथ महीपतींच्या अवलोकनांत आले तेव्हां त्यानी संत विजयांत समर्थचरित्र विस्तारेकरून वर्णिले . कै . वि . का . राजवाडे यांनी ' सरस्वतीमंदिर ' मासिकांत " नाभाजीने व महीपतीने वर्णिलेले संत " या सदराखाली एक उपयुक्त यादी प्रसिद्ध केली आहे तीत त्यांनी महीपतींच्या ग्रंथांचा जो क्रम दिला आहे त्यांत भक्तविज यानंतर संतविजय झाला असे म्हटले आहे , पण हे विधान प्रमाणशुद्ध नाही हे खुद्द महीपतींनी दिलेल्या वरील ग्रंथरचनाक्रमावरून उघड दिसते . वरील ग्रंथाशिवाय महीपतींनी ' सारांश ज्ञानेश्वरी ' या नांवाचा एक ग्रंथ तयार केला आहे , त्यांत ज्ञानेश्वरीतल्या १४३१ निवडक ओंव्या दिल्या आहेत . ओव्यांची निवड करताना ' भक्ति ' या विषयावर महीपतींनी विशेष कटाक्ष ठेविला होता असे त्या ओंव्यांवरून दिसते . हा ग्रंथ पुणे येथील ' चित्रशाळे'नें प्रसिद्ध केला आहे . महीपति स्वभावाने फार नम्र , प्रेमळ आणि मोठे बहुश्रुत होते . सगुणोपासनेकडेच त्यांचा ओढा विशेष दिसतो . ते कट्टे वैष्णव - तुकाराम बुवांचे पूर्ण अनुयायी होते . अहिंसा , भूतदया आणि वसुधैव कुटंबकत्व हे गुण त्याच्या अंगी पूर्णत्वानें वास करीत होते . त्याच्या वेळी महाराष्ट्रांत मोठा दुष्काळ पडला होता त्यास ' करंज्याचें साल ' असे म्हणतात . या दुष्काळात महीपतींनी आपल्या घरावर तुलसीपत्र ठेवून ते गरिबांकडून लुटविलें ! ती हकीकत गांवच्या जहागिरदारास ( हा मुसलमान होता हे पूर्वी सागितलेच आहे ) समजतांच त्याने महीपतींकडे पुष्कळ गाड्या भरून साहित्य पाठविलें , परंतु त्याचा स्वीकार न करितां त्यानी आपला चरितार्थ भिक्षेवर चालविला . ह्याप्रमाणे दर तीन वर्षांनी आपले घर लुटविण्याचा क्रम त्यानी चालू ठेविला . पुढे लोकांनी सांगितले की हा आपला क्रम आपल्या पश्चात् चालणे कठिण आहे तरी जे निरंतर चालेल ते करावें . मग महीपतींनी ताहराबाद येथे श्रीविठ्ठलाचें मंदिर अयाचित वृत्तीने बाधिले व तेथे आषाढ वद्य १० पासून अमावास्येपर्यंत पांडुरंगाचा उत्सव करण्याची चाल सुरू केली ती अद्याप चालू आहे . तुकारामबुवानी स्वप्नात येऊन आपणांस दृष्टात दिल्याची हकीकत मही पतीनी आपल्या ओवीबद्ध ग्रंथांत सागितलीच आहे , पण एका स्वतंत्र अभंगा तही ती सागितली आहे :
बाळपणीं मरे माता । मग प्रतिपाळी पिता ॥ तैशापरी संभाळिलें । ब्रीद आपुले साच केले ॥ यात्रा नेली पंढरीसी । ध्यान ठविलें पायासीं ।। हृदयीं प्रकटोनी बुद्धि । भक्तविजय नेला सिद्धि ।। स्वप्नीं येउनी तुकाराम । आपुलें सांगितले नाम || महीपति म्हणे हरी । तुमच्या हाती सूत्रदोरी ।। एकदां पंढरपुरास जात असतां महीपति घोड्यावरून पडले व त्यामुळे त्यांना परत घरी यावे लागले त्या वेळी त्यांनी पांडुरंगास पुढील ओवीबह पत्र पाठविलें : जय क्षीराब्धिवासा अनंता । अनंतशायी मायातीता । भक्तवत्सल पंढरीनाथा । रुक्मिणीकांता श्रीविठ्ठल
या १० च ओव्यांवरून महीपतींच्या निरपेक्ष हरिभक्तीची आणि प्रेमळ पणाची साक्ष कोणासही पटण्यासारखी आहे . परदेशांत आजारी पडलेल्या मुलाने घरी आपल्या प्रेमळ पित्यास पत्र लिहावे तसे हे पत्र महीपतींनी पांडु रंगास लिहिले आहे . दगडाच्या मूर्तीत जर देवत्व नसेल तर असलें हे अत्यंत करुणरसभरित पत्र ऐकण्यासाठी तरी तें देवत्व मूर्तीत क्षणभर तरी उत्पन्न झाले असेल यात संशय नाही . भक्त भगवंताचे ठायीं किती समरस होऊ शकतात याचा हा सुंदर नमुना आहे . महीपतींनी आपले हृदय या पत्रांत साफ उकलले आहे . आणि महीपति देवापाशी मागतात तरी काय ? धनदौलत मागतात काय ? आरोग्य मागतात काय ? दीर्घायुष्य मागतात काय ? नाही . तर , “ संबंध तोडीं या देहाचा , " " मला मृत्यु येऊ दे " अमें मागतात . महीपतींच्या ग्रंथांत सर्वत्र जो इतका प्रेमळपणा वोसंडत आहे तो कोठून आला याचा उलगडा या एका ९ ओव्यांच्या पत्रावरून येतो . गंगाजलनिर्मल अशा हृदयांत प्रेमळ पणाशिवाय दुसरे काय असणार ? पायांनी पंढरपूरची वारी करण्याचे सामर्थ्य , वार्धक्यामुळे , आपल्या अंगीं उरले नाही याबद्दल महीपतीस फार दुःख होत असे . ते म्हणतात : अभंग सदां डोळ्यांपुढे राहो तुझे ध्यान । ऐसी इच्छा पूर्ण वाटे जीवा ॥ दैवावांचोनियां निष्फळ वासना । ऐसे नारायणा दिसताहे ।। तुझे यात्रे गमन घडावें चरणीं । नसे या प्राक्तनी करूं काय ॥ आहे जो शरीर घडो परोपकार । असत्य उत्तर न यो वाचे ॥ महीपति म्हणे दाखवीं ते सोय । जेणे भवभय निवारेल आमच्या साधुसंतांस “ अंतरसाक्ष जो चैतन्यघन परमेश्वर तो जीवाची निज खूण जाणतो , त्याला भेटण्यासाठी पंढरपुरासारख्या ठिकाणीच गेले पाहिजे असें नाहीं " हे समजत होते , पण सगुणभक्तीच त्यांना विशेष प्रिय असल्यामळे आपले ' आरुप ' पत्र पांडुरंगाकडे पाठविण्यास महीपतींस काही हरकत वाटर्ल नाही . महीपतींचे गुरु तुकाराममहाराज यांनीही असेंच पांडुरंगास एक अभंग बद्ध पत्र वारकऱ्यांबरोबर पाठविले होते . देवास पत्रे पाठविणे किंवा त्याच्याशी अन्य प्रकारे सलगी करणे म्हणजे त्याचा अपमान किंवा थट्टा करणे होय असे कित्येकांस वाटते , पण असल्या अपमानाबद्दल देवाने तुकोबांस किंवा महीपतींस एखादी भयंकर शिक्षा केली होती असा पुरावा ज्या अर्थी उपलब्ध नाही , उलट असले सलगी करणारे लोकच देवास विशेष प्रिय झाले होते असें दिसते , त्या अर्थी देवाच्या मानापमानाबद्दल आपणास काळजी करण्याचे कांही प्रयोजन नाही . महीपति शके १७१२ ( इ . स . १७ ९ ० ) श्रावण वद्य १ ९ या दिवशी दिवंगत झाले . त्या वेळी त्यांचे वय ७५ वर्षांचे होते . महाराष्ट्र कविवर्य मोरोपंत यांनी महीपतींचे ग्रंथ वाचले होते , परंतु त्या उभयतांची भेट कधी झाली होती की नाही , त्यांचा परस्पर पत्रव्यवहार होता की काय , हे समजण्यास काही मार्ग नाही . महीपतींचे पुत्र विठोब गोसावी यांची पंतांस गेलेली काही पत्रे उपलब्ध झाली आहेत त्यांवरून पंत व विठोबा याचा स्नेहसंबंध होता हे मात्र उघड दिसते . हे विठोबा गोसार्व पंढरपुरास बाबा पाध्ये यांजकडे विद्याभ्यासासाठी राहिले होते . बाबांनीच त्यांची शिफारस मोरोपंतांकडे करून त्यांचा परिचय करून दिला . बाबा पंतांस एका पत्रांत लिहितात : -- " हरिदास राजेश्री विठोबा गोसावी ताहराबादकर यांही आपणास पुस्तकाविषयी लिहिले . आपण ग्रंथ पाठवून द्यावे . ते प्रति करून आपणास शीघ्र परत करतील . " यापुढे पंत व विठोबा गोसावी यांच स्नेहसंबंध जडला व तो उत्तरोत्तर दृढ होत गेला पंतांनी आपल्या ' सन्मणि माले'त महीपतींचा उल्लेख केलेला नाही . पुढे विठोबा गोसावी ताहराबादकर यांच्या सूचनेवरून त्यांनी ' महीपतिस्तुति ' या नावाचे एक लहानसे प्रकरण लिहिले ते येथे देतो : आर्या श्रीहरिभक्तजनांची श्रीहरिभक्तिरससत्सुधाभरितें चरिते गातां जेणे आयुष्य क्षण पडों दिले न रितें ॥१ ॥ हरिभक्तविजय नामें रचिला सनथ दोष साराया । वाराया तापातें प्राणी भवसागरांत ताराया ॥२ ॥

त्या महिपतिते पाहुनि ऐकुनि सञ्चित्त कां न लोभावें । शोभावे यश ज्याचें चिर नमिला विष्णुदास तो भावें ॥३ ॥ ज्याचा ग्रंथ हरिजनां सेव्य चकोरां जसा सदा इंदु । जो पसरला जगांत स्नेहाचा सत्सरी जसा बिंदु ॥ ४ ॥ सत्य तुकारामाचा या महिपतिवरि वरप्रसाद असे । सदनुग्रहाविणे हे निघतिल उद्गार सार काय असे ॥ ५ ॥ साधूंचे यश गाया येणे देऊनियां सुभाकेला । निःसंशय ताराया जड महिपति विठ्ठले उभा केला ॥६ ॥ माहिपतिच्या वाणीत सेवुनि तरतात जेवि गंगेते । विषयांत रंगले जे जनमानस सद्यशींच रंगे ते ॥७ ॥ ज्ञानोबाची जैशी एकोबाची जशी सुधा वाणी । की मुक्तेश्वर कविची महिपतिची सेविती तशी प्राणी ॥८ महिपतिचा सुत विठ्ठल त्याला श्रीपांडुरंग आठव दे । तत्प्रेरणेकरुनियां आर्या आर्यादरार्थ आठ वदे ॥९ ॥ * स्वस्तुति केली म्हणवुनि महिपति हरिभक्त न विटोबा । मज तो वाटे ऐशा साधुजनांहूनि अन्य न विठोबा ॥ १० ॥ संतांसि नावडे स्तुति है ठावें मज परंतु देवास । महिपति म्हणेल विठ्ठलराया , या निजपदींच दे वास ॥११ ॥ श्रीविठ्ठलासि आहे साधूंची फार सर्वदा भीड । चीड प्रभुसि न येइल देइल मज करुनि निजपदीं नीड ॥ १२ ॥ अंजलि करूनि असतो गरुड उभा जेवि अहिपतिसमोर । हरिभक्तिप्रेमगुणे नम्र सदा तेंवि महिपतिस मोर ॥१३ ॥ या आर्यावरून महिपतींच्या योग्यतेविषयी पंतांच्या मनांत केवढा आदर भाव होता हे स्पष्ट दिसते . वरील तिसऱ्या आर्येत “ त्या महिपतिते पाहुनी " असे शब्द आहेत त्यांवरून पंतांनी महीपतींस पाहिले होते हेही उघड दिसते . वरील आर्यात फक्त ' भक्तविजय ' ग्रंथाचा उल्लेख आहे , महीपतिकृत इतर ग्रंथांचा नाही , यावरून व " स्वतःची स्तुति केली म्हणून महीपतींस विषाद न वाटो " अशा अर्थाच्या पंतांच्या उद्गारांवरून महीपतींच्या हयातीतच पंतांनी या * या चरणांत तीन मात्रांचा एक शब्द कमी आहे .

२२ आर्या रचिल्या असाव्या यांत संशय नाही . भक्तविजय ग्रंथ लिहून होतांच तो सगळ्या महाराष्ट्रांत कसा पसरला हे “ जो पसरला जगांत स्नेहाचा सत्सरी जसा बिंदु " या आर्याधीत पंतांनी सांगितले आहे . राजाराम प्रासादीकृत भक्तमंजरीमाला , अर्वाचीन भक्तलीलामृत , कै ० द . अ . आपटे ( कवि अनंततनय ) कृत कविचरित्र , नवनीत , चरित्रकोश , ज्ञानकोश , व महाराष्ट्र सारस्वत इतक्या ग्रंथांत महीपतींची थोडीबहुत माहिती दिलेली आढळते . मी माझ्या महाराष्टकविचरित्राच्या दुसऱ्या भागात , माहिपतींचे विश्वसनीय चरित्र विस्तारपूर्वक दिले असून त्याच्याच आधाराने प्रस्तुत लेख लिहिला आहे . असो . महीपतींच्या चरित्रासंबंधाची बहुतेक महत्त्वाची माहिती येथपर्यंत दिली . महीपतराव व नरहरि महीपति या नांवाचे आणखी दोन महीपति महाराष्ट्रांत होऊन गेले आहेत व त्यांपैकी नरहरि महीपति बरेच प्रसिद्ध आहेत . ' काव्य संग्रह ' मासिकांत महीपतींची म्हणून जी पदें प्रसिद्ध झाली आहेत ती बहुतेक सर्व या नरहरि महीपतींचीच होत . महीपतींनी आपले ग्रंथ फार शोधपूर्वक लिहिले आहेत . तत्कालीन परि स्थित्यनुसार में संशोधन करणे अवश्य होतें तें करण्यांत त्यांनी बिलकुल कसूर केलेली नाही . त्यांच्यापूर्वी काही लेखकानी संतचरित्रे लिहिली होती , त्यांचा उपयोग तर त्यांनी केलाच , परंतु स्वतः पुष्कळच नवीन माहिती मिळवून तिच्या आधाराने बहुतेक सर्व संतांची चरित्रे त्यांनी विस्तारपूर्वक लिहिली . महाराष्ट्रावर हे त्यांचे मोठे उपकार आहेत . महीपतींनी ही एवढी मोठी ग्रंथ रचना केवळ विषयाची आवड म्हणून किंवा आवडीचा विषय म्हणून , निरपेक्षबुद्धीने केली . ऐतिहासिक चरित्रग्रंथ लिहिण्यासाठी जो शोध आणि खटाटोप करणे अवश्य आहे तो सगळा त्यांनी केला होता . पुष्कळ संतांच्या गांवी जाऊन , त्यांच्या वंशजांस भेटून , त्यांच्या घरची दप्तरे व पोथ्या पाहून , दंतकथा व आख्यायिका ऐकुन जी माहिती उपलब्ध झाली तिचा समावेश त्यांनी आपल्या ग्रंथांत केला आहे . पाश्चात्य वाङ्मयाच्या परिचयामुळे जी एक प्रकारची ऐतिहासिक दृष्टि हल्ली आपणांस प्राप्त झाली आहे असे आपण समजतो ती महीपतींच्या अंगी अल्पांशाने तरी होती असे मानण्यास त्यांच्या ग्रंथांत पुष्कळ पुरावा आहे . चमत्कारादि गोष्टी त्यांनी आपल्या ग्रंथांत दिल्या आहेत , इतक्याचमुळे त्यांच्या ग्रंथांची योग्यता बिलकुल कमी होत नाही . चमत्कारांवर विश्वास ठेवण्याचा तो काल होता इतकेच नव्हे तर खुद्द महीपतींनी निरनिराळ्या काळी निरनिराळ्या प्रकारचे पाचदा चमत्कार केले होते अशीही प्रसिद्धि आहे . अशा स्थितीत त्यानी , इतर साधूंनी केलेल्या अलौकिक चमत्काराच्या ज्या गोष्टी ऐकल्या त्या आपल्या ग्रंथात नमूद कराव्या यात कांही आश्चर्य नाहॉ . शिवाय , अलौकिक चमत्कारांच्या सर्वच कथा झूट असेही मानण्याचे कारण नाही . कारण हा शास्त्रीय विषय आहे . ज्या योगशास्त्राच्या जोरावर असले अलौकिक चमत्कार करून दाखविले जातात तेंदेखील एक शास्त्रच आहे . अर्थात् यांत अशास्त्रीय असे काही नाही . मात्र अतिशयोक्ति असेल तर ती केव्हांही त्याज्यच आहे . असो . महीपतींची वागी फार रसाळ , प्रासादिक आणि साधी आहे . भाषा सोपी . जुने कठिण शब्द तीत फारसे नाहीत . दीडशे वर्षांपूर्वीच्या खेडवळ देशस्थ ब्राह्मणाच्या भाषेचा तो नमुना आहे . व्याकरणदृष्ट्या महीपतीची वाक्यरचना पुष्कळ ठिकाणी सदोष आहे , परंतु भाषाशुद्धीकडे बहुतेक जुन्या कवींनी अमळ दुर्लक्षच केलेले असल्यामुळे एकट्या महीपतींसच दोष देण्यांत अर्थ नाही . मुक्तेश्वरांची प्रतिभा महीपतींत नाही , वामनाची विद्वत्ता नाही , पंतांचे भाषाप्रभुत्व नाही , किंवा श्रीधराची रसोत्कटता नाही , परंतु प्रेमळ पणाच्या बाबतीत मात्र महीपतींचा हात धरणारा दुसरा मराठी कवि नाही . ज्ञानदेव , तुकाराम , एकनाथ आणि रामदास यांची महीपतींशी तुलना करणे अयोग्य होईल . महीपतींच्या ग्रंथांत भाक्तिरस नुसता उचंबळून राहिला आहे . ज्ञानदेवांप्रमाणे उपमा व दृष्टांत देण्याची महीपतीस फार हौस दिसते व त्यांच्या उपमादृष्टांतापैकी काही उपमा व दृष्टांत फार समर्पक आणि सुंदर आहेत यांत संशय नाही ; परंतु कोठे कोठे त्यांचा अतिरेक झालेला आहे हेही नमूद केल्याशिवाय गत्यंतर नाहीं . महीपतींच्या या भोळ्याभाबड्या बालबोध ग्रंथांनी महाराष्ट्रांत फार मोठे धर्मकार्य केले आहे . संतचरित्रे हा महीपतींचा अगदी आवडता विषय . संतचरित्रवर्णनपर चार मोठे ओवीबद्ध ग्रंथ लिहून त्यांचे समाधान झाले नाही म्हणून अभंगवृत्तांत त्यांनी काही संतचरित्रे पुनः गायिली आहेत त्यांची यादी येथे देतोः

 ४७ 59 " " नामदेवचरित्र अभंग ६२ जगमित्र नागाचरित्र हरिपाळचरित्र ५८ माणकोजी बोधलेचरित्र कमालचरित्र ६७ संतोबा पवारचरित्र १०२ नरसिंह मेहताचरित्र ५२ चोखामेळाचरित्र राका कुंभारचरित्र महीपतींच्या ओव्यांप्रमाणेच त्यांची पदें व अभंग फार सुरस आहेत . त्यांनी चार चरणी करुणापर अभंग लिहिले आहेत ते , आरत्या , पदें , इतर फुटकळ अभंग , गणेशचरित्र , काही फुटकळ ओवीबद्ध प्रकरणे , व वरील अभंगबद्ध संतचरित्रे इतकी त्यांची कविता अद्याप अप्रकाशित आहे . आपल्या बहुतेक मोठया ग्रंथाच्या अखेरीस त्या ग्रंथांतील प्रत्येक अध्यायांत कोणता कथाभाग आला आहे याची अनुक्रमणिका महीपतींनी दिली असून ती त्यांच्या सशास्त्र ग्रंथरचनापद्धतीची निदर्शक आहे . आपण जे काय लिहीत आहोत ते पांडुरंगाच्या कृपेने आणि तुकाराम बुवांच्या प्रेरणेने लिहीत आहोत असा महीपतींचा ठाम समज होता , त्यामुळे , स्वतःच्या कर्तबगारीसंबंधाने ज्यांत थोडासाही अहंभाव व्यक्त झाला आहे असा एक शब्दही त्यांच्या कवितेत आढळत नाही . कै . वि . ल . भावे यांनी लिहिलेल्या ' महाराष्ट्र सारस्वत ' ग्रंथांत महीपती विषयींची आणखी काही माहिती मिळाली तिचाही येथे संग्रह करितो . महीपतीस लहानपणापासून धर्माचे व विद्यचे बाबतींत मोरोबा तांभर कर नामक एका गृहस्थाश्रमी सत्पुरुषाची शिक्षा असे . महीपतिबाबांस श्रीमंत पंतप्रधान पेशवे यांजकडून व त्याच्या सरदारांकडून काही जमिनी इनाम मिळाल्या होत्या . त्यांच्या सनदा त्यांच्या वंशजांपाशी आहेत . ह्या सनदा शके १७१० नंतरच्या म्हणजे बाबांची विशेष प्रसिद्धि झाल्यानंतरच्या आहेत . हल्ली ही इनामें चालू नाहीत .
******
(स्व. जगन्नाथ रघुनाथ आजगांवकर,मुम्बई)

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें