शुक्रवार, 18 जनवरी 2013

संत महीपति


अहमदनगर येथील सुप्रसिध्द चित्रकार श्री. वसंत विटणकर यांच्या कुंचल्यातुन संत महिपती महाराज यांचे चरित्र चित्रमय पुस्तकाच्या रुपात वाचकां समोर येत आहे. लवकरच हे पुस्तक या ब्लॉग वर वाचकां समोर येणार आहे. संबंधित पुस्तकातील काही पृष्ठ आपणां समोर सादर प्रस्तुत करीत आहे.

बुधवार, 23 मई 2012

भुक

आई ...
भुकेचे भुत घरात येताना
तुझ्या चाणाक्ष व अनुभवी डोळयांना
आधीच दिसायचे,
अन् तू आम्हा लेकरांना
भूताच्या वेताळाच्या गोष्टी रंगवून सांगू लागे,
त्या गोष्टीच्या भुता मुळे आमची भुक
पोटातुन घरातुन केव्हाच दूर पळायची,
पहाट झाली की कळायचे भुत पळाले आहे.
पण एक चांगले झाले आई
भुकेची भिती आयुष्यातुन केव्हा
दूर झाली ते आम्हाला कधीच  कळाले नाही.
आता भुकेच्या गोष्टी आठवल्या की
पंच पक्वानाचे जेवण पोटात जात नाही, आई


गुरुवार, 8 दिसंबर 2011

संत महिपती ताहराबादकर यांच्या विठ्ठल मंदिरातील आड

संत महिपती महाराज ताहराबादकर यांनी स्थापन केलेल्या विठ्ठल रूक्मीणी मंदिराच्या मागे असलेला आड. याच आडातील पाणी ते पुजेकरीता वापरीत. आजही तेथील त्यांचे पुर्वज या आडाचा उपयोग करीत आहेत.
ताहराबाद ता.राहुरी जि. अहमदनगर येथील संत महिपती यांनी स्थापन केलेले सतराव्या शतकातील विठ्ठल मंदिर. वयोमानामुळे संत महिपती पंढरपुर येथे पायी वारीत जाऊ शकले नाही. तेव्हा त्यांनी विठ्ठलाची विनवणी केली की मला माफ कर मी आता तुला भेटायला येऊ शकत नाही. याच विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी नंतर स्वत: पांडुरंग आपल्या भक्ताला भेटायला येतात अशी आख्यायिका आहे. पाऊलघडी हा कार्यक्रम पाहण्यासाठी मंदिरात हजारोंची गर्दी होते. यावेळी पांडुरंगाची पाऊले कुंकवाच्या रंगात शुभ्र चादरीवर  साकारलेली दिसतात. 

बुधवार, 7 दिसंबर 2011

संत महिपती ताहराबादकर देवस्थान

संत महिपती ताहराबादकर देवस्थान ट्रस्ट यांनी स्थापन केलेले नवीन मंदिर जिथे संत महिपती व त्यांचे दोन पुत्र ह.भ.प. विठ्ठल बुवा व ह.भ.प. नारायण बुवा यांची समाधी वर हे मंदिर उभारले आहे.

संत महिपती देवपुजेतील खाजगीतील देवांच्या मुर्ती

संत महिपती महाराज यांच्या  देवपुजेतील खाजगीतील देवांच्या मुर्ती ताहराबाद येथील विठ्ठल मंदिरात जतन करुन ठेवल्या आहेत. यात मुरलीधर, राधा कृष्ण, विष्णु व गजानन यांच्या मुर्ती आहेत.

संत महिपती पादुका

ताहराबाद येथील विठ्ठल मंदिरात त्या आजही त्यांच्या पुर्वजांनी जपुन ठेवल्या आहेत. शेजारी महाराज देवपुजेत वापरत तो शंख ठेवला आहे.