बुधवार, 10 मार्च 2010

संत महिपती यांची ग्रंथ संपदा

ग्रंथाचे नाव अध्याय ओव्या रचना शक
१) श्रीभक्तविजय ५७ ९९१६ १६८४
२) श्रीकथासरामृत १२ ७२०० १६८७
३) श्रीसंतलीलामृत ३५ ५२५९ १६८९
४) श्रीभक्तलीलामृत ५१ १०७९४ १६९६
५) श्रीसंतविजय २६ (अपूर्ण) ४६२८ १६९६
६) श्रीपंढरी म्हात्म्य १२ - -
७) श्रीअनंत व्रतकथा - १८६ -
८) श्रीदत्तात्रेय जन्म - ११२ -
९) श्रीतुलसी महात्म्य ५ ७६३ -
१०) श्रीगणेशपुराण (अपूर्ण) ४ ३०४ -
११) श्रीपांडुरंग स्तोत्र - १०८ -
१२) श्रीमुक्ताभरणव्रत - १०१ -
१३) श्रीऋषीपंचमी व्रत - १४२ -
१४) अपराध निवेदन स्तोत्र - १०१ -
१५) स्फुट अभंग व पदे - - -
या एकंदर ग्रंथाची ओवीं संख्या चाळीस हजाराचे आसपास आहे.
याशिवाय 'महाराष्ट्र कवि चरित्रकार' श्री. ज. र. आजगावकर यांनी लिहिल्याप्रमाणे बोवांनी काही नामांकित संतांची चरित्रे अभंगवृत्तातही गाइली आहेत. ती पुढीलप्रमाणे -
श्री नामदेव चरित्र अभंग ६२
श्री हरिपाळ चरित्र अभंग ५८
श्री कमाल चरित्र अभंग ६७
श्री नरसी मेहता चरित्र अभंग ५२
श्री राका कुंभार चरित्र अभंग ४७
श्री जगमित्र नागा चरित्र अभंग ६३
श्री माणकोजे बोधले चरित्र अभंग ६७
श्री संतोबा पवार चरित्र अभंग १०२
श्री चोखामेळा चरित्र अभंग ४७
एकदा ओवी वृत्तात विस्ताराने वर्णिलेली काही संत चरित्रे त्यांनी पुन्हा अभंग वृत्तातही वर्णिली आहेत, यावरूनच बोवांचे संत विषयक प्रेम उत्तम रितीने व्यक्त होते.
बोवांचा श्रीभक्तलीलामृत
ओवी संख्येचा विचार करता 'श्री भक्तलीलामृत' हा बोवांचा सर्वात मोठा ग्रंथ. या ग्रंथात असून ओवीं संख्या १०७९४ एवढी मोठी आहे.
प्रस्तुतच्या अवीट गोडीच्या ग्रंथलेखनाचे कार्य बोवांनी जयनाम सवत्सरी शके सोळाशे शहाण्णवमध्ये फाल्गुन कृष्ण चरुर्थीस (म्हणजे इ. स. १७७४ मध्ये)
ताहराबाद मुक्कामी पूर्ण केले. या ग्रंथात श्रीचांगदेव, श्रीज्ञानेश्वर, श्रीनरसिंह सरस्वती, श्रीतुकाराम, श्रीएकनाथ, श्रीभानुदास, संतोबा पवार, विठ्ठल पुरंदर, माणकोजी बोधला, इत्यादी संत सत्पुरुषांची चरित्रे बोवांनी आपल्या प्रासादिक भाषेत वाचकांच्या डोळ्यासमोर साकार केले आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें